नांदेडमध्ये 20 महिलांची हत्या करणार्‍या सीरियल किलरला अटक

December 20, 2010 11:42 AM0 commentsViews: 5

20 डिसेंबरनांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण केलेल्या सिरीयल किलरला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. पण देगावमधील गावकर्‍यांच्या मदतीने या संशयित सिरीयल किलरला पकडण्यात आलं. गेल्या चार महिन्यात या सिरीयल किलरने 20 महिलांच्या अंगावरील सोनं लुटुन त्यांच्या हत्या केल्या होत्या. गेल्या चार महिन्यात या सर्व महिलांच्या झालेल्या हत्या एकाच पद्धतीने केल्या गेल्याचे पोलिस तपासात आढळून आलं. पोलिस या प्रकरणाची आणखीही कसून तपासणी करत आहेत. पण आरोपीला पकडल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला.

close