कांद्याच्या निर्यातीवर बंदी

December 20, 2010 1:13 PM0 commentsViews: 6

20 डिसेंबर

कांद्याचे वाढते दर पाहून काळजीत पडलेल्या सरकारने कांद्याची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जानेवारीपर्यंत ही निर्यात बंद राहणार आहे. निर्यातदारांना नव्याने परवानगी देऊ नये अशी सूचना सरकारने केली आहे. सध्या ना हरकत प्रमाणपत्र असलेल्यांनाही निर्यातीला परवानगी मिळणार नाही. कांद्याच्या वाढत्या दरांबाबत नाफेडची आज तातडीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

नाशिकच्या घाऊक बाजारात विक्रमी दराने कांद्याची विक्री झाली आहे. मनमाड बाजार समितीत 5 हजार 600 रुपये क्विंटल, लासलगाव बाजार समितीत कमाल 6 हजार 500 रुपये क्विंटल, नांदगाव बाजारसमितीत 5 हजार रुपये क्विंटल या चढत्या दराने कांद्याची विक्री झाली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली. बाजारातल्या मागणीपेक्षा कांद्याची आवाक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात हा कांदा 70 रुपये किलोच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.

भाज्याही प्रचंड महागल्यात

कांद्याला सोन्याचा भाव आल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी तर आलेलेच आहे. सांगलीत कांद्याचा दर 80 रुपये किलोवर पोहचला आहे. तसेच इतर भाज्यांचे भावही भडकले आहेत.

वांगी – 45 ते 50 रुपये किलोदोडका – 50 ते 60 रुपये किलोभेंडी – 60 ते 65 रुपये किलोफ्लॉवर – 50 ते 55 रुपये किलोढोबळी मिरची – 45 ते 50 रुपये किलोकारली – 40 ते 50 रुपये किलोटोमॅटो – 40 ते 50 रुपये किलोगवारी – 60 रुपये किलोलसूण – 250 रुपये किलो

close