पुण्यात तिबेटियन वास्तूकलेवर आधारित बौध्द विहार उभारले

December 20, 2010 3:02 PM0 commentsViews: 51

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड

20 डिसेंबर

जगाला शांतीचा संदेश देणा-या भगवान गौतम बुध्दांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास आता पिंपरी-चिंचवड मध्ये करता येणार आहे. नांलंदा विद्यापीठाच्या धर्तीवर पिंपरीमध्ये तिबेटियन वास्तूकलेवर आधारित एक बौध्द विहार उभारण्यात आलं आहे. अशा प्रकारचे हे देशातील पहिलंच बौध्द विहार आहे.

जगात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करणार्‍या बौद्ध भिख्खुंचं दृश्य पाहून आपण नेपाळ, ब्रम्हदेश आणि चीनमधील बुद्ध विहारांची आठवण होते. पण आता अशा प्रकारचा बुद्ध विहार पिंपरी चिंचवडमध्ये बांधण्यात आला आहे. तिबेटीयन वास्तुकलेचा वापर करुन हे बौद्धविहार तयार करण्यात आले आहे. या विहारला आता अभ्यासकही भेटी देऊ लागले. या विहारातील गौतम बुध्दांची प्रत्येक मूर्ती ही चीनमधुन मागवण्यात आली आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठीच बौद्ध धर्माचा प्रचार सुरू असतो. पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झालेल्याया बुद्धविहारामुळे आता या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळणार आहे.

close