सौरऊर्जेच्या माध्यमातून 65 वर्षांनी उजळणार एलिफंटा बेट

December 20, 2010 4:39 PM0 commentsViews: 5

20 डिसेंबर

भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईपासुन पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेट अर्थात एलिफंटा आज(सोमवारी) प्रकाशाने उजळणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 65 वर्ष घारापुरी बेटावरील तीन गाव आणि तिथं राहणारे दीड हजार रहिवासी हे अंधारात राहत होते. गेले कित्येक वर्ष त्यांनी विजेसाठी प्रयत्न केले. पण सरकार दरबारी त्यांना अपयश आलं. आता मात्र एका ऑस्ट्रेलियन कंपनीने या बेटावर सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करणारे उपकरण बसवले आहे. त्यामुळे घारापुरी बेटवर आज पहिल्यांदा वीज येणार आहे. मुंबईपासून जवळच असलेल्या या बेटावर वर्ल्ड हेरिटेज बौद्ध लेण्या आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने घारापुरी अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. पण सरकारी लालफितीच्या कारभारामुळे घारापुरी आजपर्यंत अंधारातच होती. आजचा दिवस घारापुरी वासियांच्या आयुष्यात उद्याचा उष:काल घेऊन येणारा आहे.

close