जळगावमध्ये तहसील कार्यालयाला आदिवासींचा घेराव

December 21, 2010 10:10 AM0 commentsViews: 1

21 डिसेंबर

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसील कार्यालयासमोर जवळपास 5 हजार आदिवासीं कालपासून ठाण मांडून बसले आहेत. वनाधिकार कायद्यांतर्गत वन जमिनी देण्याबाबत ठोस निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं आहे. तहसीलदारांनी संध्याकाळी सातपर्यत मार्ग काढू असं आश्वासन दिलं होतं पण तोडगा काढला नाही म्हणून आंदोलकांनी तहसील कार्यालयाला घेराव घातला. जोपर्यंत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

close