सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

December 21, 2010 10:17 AM0 commentsViews: 8

21 डिसेंबर

दिलीप सानंदा यांच्या सावकारीमुळे विलासराव देशमुख अडचणीत आले आहेत. मात्र बुलढाण्यातील शेतकर्‍यावरील सावकारी पाश कमी होतांना दिसत नाही. विलासराव देशमुख यांच्या प्रकरणाला काही दिवस उलटत नाही तोच सावकारी पाशामुळे मलकापूर तालुक्यातील वडोदा गावातील एका शेतकर्‍याला आत्महत्या करावी लागली आहे. कर्जासाठी सावकाराने लावलेल्या तगाद्यामुळे स्वत:च्या शेतात विष प्राशन करुन या शेतकर्‍याने आत्महत्या केली. हरिशचंद्र गायकवाड अस या शेतकर्‍याचे नाव असून सावकार नंदू गांधी याच्या छळामुळे कंटाळून आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले आहेत. या शेतकर्‍याकडे 8 एकर जमीन होती पेरणीसाठी गावातील नंदू गांधी याच्याकडे कर्ज या शेतकर्‍याने घेतले होते. कोर्‍या बॉडपेपरवर स्वाक्षर्‍या घेतल्यानंतर पैशासाठी नंदूने त्रास देण सुरु केल तसेच धमक्याही दिल्या. या सावकारावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

close