दक्षिण आफ्रिका दौरा ; टी -20 आणि वनडेसाठी भारतीय टीम जाहीर

December 21, 2010 11:03 AM0 commentsViews: 20

21 डिसेंबर

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सध्या टेस्ट सीरिज सुरु आहे. टेस्ट सीरिजनंतर या दोन्ही टीमदरम्यान टी-20 आणि 5 वन डे मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. या सीरिजसाठी आज 16 खेळाडूंच्या भारती टीमची घोषणा करण्यात आली. न्युझीलंडविरूद्धच्या सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आलेला सचिन तेंडुलकर टीममध्ये परतला आहे. तसेच वर्ल्ड कप टीमचा विचार करून अपेक्षेप्रमाणे युसूफ पठाण, आशिष नेहरा आणि विराट कोहलीचाही या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र ईशांत शर्माला टीममध्ये स्थान देण्यात आलेले नाही. मुंबईचा बॅट्समन रोहित शर्माकडेही कानाडोळा करण्यात आला. या टीमवरूनच वर्ल्ड कप टीमचा अंदाजा लावला जात आहे.टी-20 आणि वन डे टीम

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार)वीरेंद्र सेहवागगौतम गंभिरसचिन तेंडुलकर विराट कोहलीसुरेश रैनायुवराज सिंगहरभजन सिंगजहिर खानआशिष नेहराप्रवीण कुमारमुनाफ पटेलआर अश्विनयुसुफ पठाणपियुष चावलाश्रीसंत

close