ठाणे साहित्य संमेलन : आंदोलकांनी लोकशाहीचा मार्ग स्विकारावा -आर.आर. पाटील

December 21, 2010 11:46 AM0 commentsViews: 2

21 डिसेंबर

ठाण्यातल्या साहित्य संमेलन संयोजकांनी मागितलं तर संरक्षण पुरवू तसेच आंदोलकांनी तोडफोड करू नये लोकशाही मार्गाने मागण्या मांडाव्यात असं प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदलण्याच्या मागणीबाबत केले.

दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदला अन्यथा संमेलन उधळून लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडने काही दिवसांपूर्वी केला होता. आर. आर. पाटील यांनी सावध भूमिका घेत वाद टाळण्याचा सल्ला दिला मात्र जाणता राजा यां महानाट्यातील दादोजी कोंडदेव आणि रामदास यांच्या व्यक्तीरेखा वगळा अन्यथा प्रयोग होऊ देणार नाही याबाबतच्या प्रश्नावर भाष्य करणं आबांनी टाळलं.

close