आदर्श सोसायटी प्रकरणी हायकोर्टाने सरकारला फटकारले

December 21, 2010 12:40 PM0 commentsViews: 2

21 डिसेंबर

आदर्श सोसायटी प्रकरणात हायकोर्टात सुनावणीमध्ये आदर्श सोसायटी संदर्भातील पुरवलेल्या कागदपत्रांत फेरफार केल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिकार्‍यानी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे.असे सांगत हायकोर्टानं एमएमआरडीए आणि राज्य सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली.

आदर्श सोसायटी प्रकरणी आज पर्यंत कोण कोणत्या समिती नेमण्यात आल्या आहेत ते सांगावे नुसतं समिती स्थापन करुन काही होणार नाही . राज्य सरकारनं वायफळ बडबड न करता ठोस पावलं उचण्याची गरज आहे या प्रकारामुळे या खटल्याला वेळ लागत आहे. तर आदर्श सोसायटीमध्ये फक्त दोनच कारगीलचे सदस्य आहेत. असा खुलासा ही केला. तसेच या पुढील सुनावणी 23 डिसेंबरला होणार आहे.

close