लवासा प्रकरणात शरद पवारांचे आर्थिक हितसंबंध – मेधा पाटकर

December 21, 2010 2:08 PM0 commentsViews: 3

21 डिसेंबर

लवासा प्रकरणात शरद पवारांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. हा प्रकल्प वादात सापडल्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी दोन हजार कोटींचे शेअर्स विकलेले आहेत. असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला आहे. तसेच प्रकल्प छोटा की मोठा हे बघण्यापेक्षा प्रकल्पातील नेत्यांचा पैसा छोटा की मोठा हे तपासण्याची गरज आहे असे सडेतोड प्रत्युत्तर जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी शरद पवार यांना औरंगाबाद येथे दिलं. महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पांना एनजीओ, सामाजिक कार्यकर्त्या आणि मीडियाचा विरोध होत असल्याबद्दल पवारांनी केलेल्या विधानावर पाटकर यांनी ही प्रतिक्रिया नोंदविली. या प्रकल्पाचे अनधिकृत बांधकाम पाडल्याखेरीज अन्य कोणताही मार्ग नाही असंही त्यांनी ठासून सांगितलं.

close