‘इचार करा पक्का ‘च्या शूटिंगला अशोक चव्हाण हजर

December 21, 2010 2:53 PM0 commentsViews: 2

21 डिसेंबर

आदर्श घोटाळ्यावरुन आता कोर्टात ब-याच घडामोडी घडतायत आणि याच घोटाळयातील आरोपांमुळे ज्यांना खुर्ची सोडावी लागली ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमध्ये मन गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. भरत जाधव आणि प्राची शहा यांचा आगामी सिनेमा 'इचार करा पक्का'चं शूटिंग सध्या नांदेडमध्ये सुरु आहे. हे शूटिंग बघायला हजर होते अशोकराव चव्हाण. या सिनेमाला त्यांनी शुभेच्छाही दिल्या आणि कलाकारांशी गप्पाही मारल्या.अशोकरावांचा इचार अजून पक्का होत नाही. त्यामुळे त्यांनी सध्या रिलॅक्स राहून सिनेमा वगैरे क्षेत्रात मन रमवण्याचा विचार केलेला दिसतो.

close