मुंबईत उस्ताद राशिद खान आणि शंकर महादेवन यांची जुगलबंदी

November 1, 2008 12:45 PM0 commentsViews: 6

1 नोव्हेंबर मुंबई -रचना सकपाळनामांकीत संगीतकारांच्या जुगलबंदी आपल्याला माहीत आहेत. मग ते गायन असो किंवा वादन..अशीच एक 'समन्वय' नावाची जुगलबंदी होणारेय उस्ताद राशिद खान आणि शंकर महादेवन यांच्यात आणि त्यासाठीच त्यांचा सध्या रियाझ सुरू आहे.एका बाजूला कर्नाटकी संगीतातलं मोठं नाव उस्ताद रशीद खान तर दुस•या बाजूला हिंदुस्थानी संगितातला आघाडीचा संगीतकार शंकर महादेवन एकाच वेळी एकाच मंचावर जुगलबंदीच्या रुपात पहायला मिळणार आहे. येत्या 2 नोव्हेंबरला षण्मुखानंद हॉलमध्ये ही जुगलबंदी रंगणार आहे. संगीतक्षेत्रातल्या या दोन मान्यवरांना अशाप्रकारे अनुभवणं याला जुगलबंदी म्हणायची का संगीताची मेजवानी ते मात्र ठरवावं लागेल.

close