युतीतला तणाव निवळला

December 21, 2010 3:55 PM0 commentsViews: 1

21 डिसेंबर

राज ठाकरे यांच्या भाजप भेटीनंतर निर्माण झालेला युतीतला तणाव आता निवळला आहे. एनडीएच्या उद्याच्या घोटाळ्याविरोधातल्या रॅलीत भाग घेणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. राज यांच्या भेटीबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडे राज ठाकरे यांच्या भाजप कार्यलयाला दिलेल्या भेटीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीची सेनाभवनात बैठक झाली. या बैठकीला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित होते.

close