आम्ही दोघ मिळून राज्याला प्रामाणिकपणे पुढे नेऊ – मुख्यमंत्री

December 21, 2010 5:24 PM0 commentsViews: 3

21 डिसेंबर

खुद्द शरद पवारांनीच मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची निवड चांगली असल्याचे सर्टीफिकेट दिलं आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि आपण मिळून पुढची चार वर्षे चांगले काम करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तर अजित पवार आणि आपण दोघे मिळून राज्याला आणखी पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी लिहिलेल्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात हे दोघेही नेते बोलत होते.

close