नीरा राडिया यांची सीबीआय चौकशी

December 21, 2010 5:30 PM0 commentsViews:

21 डिसेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडियांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सीबीआयने आज नीरा राडिया यांची तीन तास चौकशी केली. सीबीआयच्या टीमने राडिया यांच्या छत्तरपूर इथल्या घरात जाऊन त्यांची चौकशी केली. राडिया या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली संशयित आहेत. सरकारी कर्मचार्‍यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आरोपाबाबत आणि राडियांनी कुणाच्या बाजूने लॉबिंग करण्याचा प्रयत्न केलाय का याबद्दल सीबीआयने आज त्यांची चौकशी केली. त्यांची पुन्हा एकदा चौकशी केली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. राडिया आणि ए राजा यांना सीबीआयने कालच समन्स बजावलं होतं. यानंतर राजा यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

close