कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी

December 22, 2010 10:40 AM0 commentsViews: 101

22 डिसेंबर

सागरी सुरक्षेचा भाग म्हणून कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रात असणा-या नौदलाच्या बोटींपासून मच्छीमारांनी आपल्या नौका 200 ते 300 मीटर दूर ठेवाव्यात अशा सुचना मत्स्यविभागाकडून मच्छीमारांपर्यंत पोचवल्या जात आहेत. गुप्तचर यंत्रणांनी मत्स्यविभागाला दिलेल्या आदेशानुसार खोल समुद्रातल्या नौदलांच्या जहाजांवर एखाद्या मच्छीमारी नौकेद्वारे हल्ला होऊ शकतो अशी माहिती असल्यामुळे मच्छीमारांना सतर्क करण्यात आलं आहे.

close