कांद्याच्या भावात घट ; केंद्र सरकारनंही कांद्यावरचा आयात कर हटवला

December 22, 2010 9:54 AM0 commentsViews: 17

22 डिसेंबर

कांद्याच्या सततच्या चढ्या भावानंतर आज भाव काहीसे उतरले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचे भाव थोडेसे का होईना पण उतरलेले आहेत. लासलगावात कांदा 2400 रुपये प्रति क्विंटल दराने मिळतोय. तर नांदगावमध्ये कांदा आता 3000 रूपये क्विंटल दराने मिळत आहे. घाऊक बाजारात भाव कमी झाल्याने आता किरकोळ बाजारातही भाव उतरतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कालच कृषीमंत्री शरद पवार यांनी येत्या दोन आठवड्यांमध्ये कांद्याचे भाव उतरतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. सध्या कांद्याची निर्यातही थांबवण्यात आली. गेले काही दिवस कांद्याच्या भावामुळे सामान्य नागरिक वैतागले होते. केंद्र सरकारने कांद्यावरचा आयात कर हटवल्यावे कांद्याच्या दर आणखी घसरण्याची शक्यता आहे.

कांद्याचे आजचे भाव

नाशिक

लासलगाव – 24 रु/ किलोनांदगाव – 30 रु/ किलो

नागपूर – 40 रु/ किलोपुणे – 70 रु/किलोजळगाव – 50 रु/ किलो औरंगाबाद – 50 रु/किलोकोल्हापूर – 60 रु/ किलो मुंबई – 40 रुपये किलोठाणे – 55 रु/किलो

close