हवाई इंधनाच्या दरात घट

November 1, 2008 12:55 PM0 commentsViews: 4

1 नोव्हेंबर, दिल्लीएअरलाईन्स उद्योगासाठी तेल कंपन्यांकडून चांगली बातमी आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एटीएफसाठी म्हणजे हवाई इंधनासाठी कमी दर आकारले जातील अशी घोषणा केली आहे. आता एअरलाईन्ससाठी हवाई इंधनाच्या एक किलोलीटरमागे सुमारे दहा हजार रुपये कमी होणार आहेत. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील. तेल कंपन्या एटीएफच्या दरात सुमारे सतरा टक्के एवढी घट करणार आहेत. त्याचबरोबर जेट विमानांसाठी हवाई इंधनावरील सीमाशुल्क हटवण्यात आलं आहे. या दोन्ही गोष्टींमुळे विमान कंपन्यांना हवाई इंधन स्वस्त पडेल. पण अजून विमानकंपन्यांकडून तिकिटांच्या दरात घट करण्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.

close