जाणता राजा नाटकावर संभाजी ब्रिगेडची सेन्सॉरशिप

December 22, 2010 10:32 AM0 commentsViews: 14

22 डिसेंबरजाणता राजा या महानाट्याच्या निर्मात्यांनी संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांपुढे माघार घेतली संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपानंतर जाणता राजाच्या नव्या प्रयोगात दादोजी कोंडदेवांचे महत्व कमी करण्यात आलं. तसेच गागाभट्टांच्या तोंडचे एक वाक्य ही वगळण्यात आलं. शिक्षणाच्या आईचा घो नंतर संभाजी ब्रिगेड जाणता राजा या महानाट्यावरही राजकीय सेन्सॉरशिप लादण्याचा प्रयत्न करतं आहेत. आणि त्यात संभाजी ब्रिगेडला यश येतं असल्याचे दिसतं आहे. आपल्या आक्षेपानंतर नव्या प्रयोगांमध्ये दुरुस्त्या करण्यात येतात की नाही हे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कालचा प्रयोग पाहून खात्री करुन घेतली. पण अजूनही संभाजी ब्रिगेडचे सर्व आक्षेप मान्य करण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आलं. 15 दिवसांत सुधारणा केल्या नाहीतर बाबासाहेब पुरंदरेंच्या घरापुढे आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.

संभाजी ब्रिगेडच्या आक्षेप

- महानाट्यात दादोजी कोंडदेवांचे उदात्तीकरण नको- शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी गागाभट्टांच्या तोंडी असलेले एक वाक्य वगळा – राज्याभिषेक सोहळा सुरू असताना समर्थ रामदास सोहळा थांबवून जय जय रघुवीर समर्थचा घोष करतात- नव्या प्रयोगात हा प्रसंग मात्र कायम आहे

जाणता राजामध्ये राज्यभिषेकाच्यावेळी गागाभट्टांच्या तोडी एक वाक्य आहे त्यात गागाभट्ट म्हणतात की, "महाराज आपण छत्रपती झाला आहात. परंतु आपण धर्मविरोधी कृत्य केल्यास धर्म-मार्तंड हा धर्मदंड आपल्या मस्तकी मारतील" संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपानंतर हे वाक्य वगळण्यात आलं.

close