कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेतील तिघा अधिकार्‍यांना मारण्याचा कट

December 22, 2010 11:12 AM0 commentsViews: 5

22 डिसेंबर

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या तीन अधिकार्‍यांना मारण्याचा कट रचला जातोय असा आरोप करण्यात आला आहे. हा कट रचण्यात तिहार जेलचे अधिकारी मदत करत असल्याचा दावा जेलमधल्याच आरोपींनी केला आहे. यासाठी त्यांना जेल अधिकार्‍यांनी चाकू आणि पिस्तूल पुरवल्याचा दावाही आरोपींनी केला आहे.

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांचे निकटवर्तीय दरबारी, जयचंद्रन आणि संजय महेंद्रू यांना अटक करण्यात आली होती. या तीघांना सध्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले आहेत.

close