साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

December 22, 2010 11:52 AM0 commentsViews: 3

22 डिसेंबर

84 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला अवघे 3 दिवस उरले आहे. त्यामुळे आता तयारी अंतिम टप्प्यात आली. मुख्य मंडपाचे काम जोरात सुरु झालं आहे. उशीरा का होईना सुरू झालेल्या या मंडपाचे काम 23 तारखेला रात्रीपर्यंत पूर्ण होईल असा विश्वास कंत्राटदारांना व्यक्त केला आहे.साहित्य संमेलनातल्या मुख्य मंडपातील व्यासपीठ कसे असेल याचा एक एक्स्ल्युझिव्ह फोटो आयबीएन लोकमतच्या हाती लागला आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी या व्यासपीठाचे डिझाईन केले आहे.

close