डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तीन वर्षाच्या चिमुकल्यावर अपंग होण्याची वेळ

December 22, 2010 12:29 PM0 commentsViews: 43

22 डिसेंबर

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकल्यावर अपंग होण्याची वेळ आली. खेळताना पडल्याने तीन वर्षाच्या मोहम्मद शेखच्या मांडीचे हाड मोडले होते. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला 26 नोहेंबरला ठाणे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार न करता नुसती पट्टी बांधून जाण्यास सांगितल्याचा आरोप पालकांनी केला. मात्र यामुळे या लहान मुलाच्या पायाची नस दबली गेली. आणि आता त्याचा पाय कापावा लागणार असल्याचे नायर हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे ठाण्यातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मुलाच्या नातेवाईकांनी केली. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. दरम्यान ठाणे महानगरपालिकेने चौकशी समिती नेमून हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

close