लवासाच्या बांधकामाला अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती

December 22, 2010 12:47 PM0 commentsViews: 2

22 डिसेंबर

लवासाप्रकरणी मुंबई हायकोर्टाने अंतिम निर्णयापर्यंत कोर्टाने बांधकामाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची सूचनाही कोर्टाने केली. ही समिती पर्यावरणावर परिणामाची छाननी करेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही समिती लवासाला भेट देईल. दौर्‍याच्या वेळी काही स्थानिक सामाजिक संस्थाना सहभागी करावे असंही कोर्टाने सांगितले आहे.

10 जानेवारीला ही समिती आपला अहवाल सादर करेल. तसेच महाराष्ट्र सरकारने जमीन हस्तांतरण आणि पुनर्वसनाविषयीचे रिपोर्ट सादर करावेतअसे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. याप्रकरणाची पुढची सुनावणी 27 जानेवारीला होणार आहे.

close