साहित्य संमेलन संभाजी ब्रिगेडने उधळून दाखवावे – एकनाथ शिंदे

December 22, 2010 1:38 PM0 commentsViews: 18

22 डिसेंबरठाण्यातील साहित्य संमेलन संभाजी ब्रिगेडने उधळून दाखवावे असं आव्हान शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी दिलं. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव महानगरपालिकेने बदलावे नाहीतर संमेलन होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. त्यावर संमेलनाचा या वादाशी काही संबंध नसून संभाजी ब्रिगेडने असं आंदोलन करु नये असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. दरम्यान हा महानगरपालिकेचा विषय असल्याने त्यावर त्यांनीच निर्णय घ्यावा असे मत वसंत डावखरे यांनी व्यक्त केले.

ठाण्यातल्या साहित्य संमेलन संयोजकांनी मागितले तर संरक्षण पुरवू असं सांगतानाच आंदोलकांनी तोडफोड करू नये लोकशाही मार्गाने मागण्या मांडाव्यात असं प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदलण्याच्या मागणीबाबत काल केले होते.

close