रिलायन्स एनर्जीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

December 22, 2010 1:18 PM0 commentsViews: 6

22 डिसेंबर

मुंबईत रिलायन्स एनर्जीविरोधात आज शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केले. बिर्ला मातोश्री सभागृह इथं रिलायन्स भागधारकांची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. पण रिलायन्स एनर्जीमधील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी शिवसैनिकांनी हे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व गजानन किर्तीकर यांनी केले.

close