मुंबई मॅरेथॉन स्पर्धा 15 जानेवारीला

December 22, 2010 1:25 PM0 commentsViews: 2

22 डिसेंबर

आशियातली सगळ्यात श्रीमंत मॅरेथॉन असलेल्या मुंबई मॅरेथॉनचे काऊंट डाऊन सुरू झालं आहे. 2011 ची मॅरेथॉन पंधरा जानेवारीला होणार आहे. यंदाच्या मॅरेथॉनसाठी खास गाणंही तयार करण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत हे गाणं लाँच करण्यात आलं. यावेळी मॅरेथॉनचा ब्रँड ऍम्बेसेडर जॉन अब्राहमही उपस्थित होता. या गाण्याची कल्पना तौफिक कुरेशी यांची असून शाननं गाणं गायलं आहे. यंदा विजेत्या खेळाडूंना तब्बल दिड कोटीची बक्षिसं देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात कविता राऊतचा सत्कारही करण्यात आला.

close