गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत 498 धावांचा विक्रम

December 22, 2010 3:19 PM0 commentsViews: 4

22 डिसेंबर

गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत एक नवा बॅटिंग विक्रम रचला गेला आहे. रिझवी स्प्रिंगफिल्डच्या अरमान जाफरने 498 रन्स केले आहेत आणि शालेय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. कर्नाटक स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या या मॅचमध्ये रिझवीने राजा शिवाजी शाळेविरूद्ध खेळताना 6 विकेटवर 800 रन्सचा स्कोअर उभारला. यात अरमानचा वाटा होता 498 रन्सचा. आणि अवघ्या 490 बॉल्समध्ये त्यानं हा स्कोर उभा केला. अरमानच्या या खेळीत तब्बल 77 फोरचा समावेश होता. याआधी हा विक्रम रिझवीच्याच सरफराज खानच्या नावावर होता. सर्फराझनं 439 रन्स केले होते.

close