बिल्डरच्या पूतण्याचा नागरिकांवर हल्ला

December 22, 2010 4:08 PM0 commentsViews: 7

22 डिसेंबर

पुण्यापासून 12 किलोमीटर अंतरावर खडकवासला ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका बिल्ंडिगच्या बांधकामाच्या वादातून महिला लहान मुलांसह ग्रामस्थांना शिवीगाळ मारहाणीचा प्रकार घडला. बिल्ंडिगला कायदेशीर मान्यता नसताना बांधकामामुळे येण्या जाण्याच्या रस्त्यावर आक्रमण होत असल्याचा कोल्हेवाडी ग्रामस्थांचा बिल्डर विलास मतेंवर आरोप आहे. या वादातून मतेंचा पुतण्या कुणाल याने 30-40 जणांसह बांधकामाच्या विटांनी हल्ला चढवत गाड्यांची तोडफोड करत ग्रामस्थांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला तर बिल्डर विलास मते यांनी गावकर्‍यांवर दमदाटी दादागिरीचा प्रतिआरोप केला. या प्रकरणी खडकवासला पोलीस चौकीत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांनी दंगलीचाही गुन्हा दाखल झाला. मारहाणीत जखमी झालेले शिवसेनेचे माजी सरपंच विजय कोल्हे यांना खाजगी रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विलास मतेही शिवसेनेचेच कार्यकर्ते आहेत. या प्रकरणामुळे कोल्हेवाडी- किरकिटवाडी परिसरात भितीचे वातावरण आहे.

close