मिकी पाशेकोंना पुन्हा मंत्रिमंडळात घ्या ; शरद पवारांचे आदेश

December 22, 2010 5:10 PM0 commentsViews: 1

22 डिसेंबर

गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी ताबडतोबत मंत्रिमंडळात घ्या असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिगंबर कामत सरकारला दिले आहेत. गोवा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेंद्र सीरत यांनी ही माहिती दिली. नाडिया टोरॅडो या महिलेच्या हत्याप्रकरणात पाशेको यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे गेल्या जूनमध्ये पाशेको यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसमधल्या काही मंत्र्यांचा पाशेको यांना परत घ्यायला विरोध आहे. पण पवारांच्या आदेशानुसार लवकरच पाशेको यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. दरम्यान राष्ट्रवादीच्या हायकमांडनी जोस फिलीप डिस्युझा आणि नीलकांत हळरणकर या दोन मंत्र्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. पण त्यांनी पद सोडायला नकार दिला.

close