राष्ट्रपतींच्या हस्ते कै.यशवंतराव चव्हाण यांच्या तिकिटाचे अनावरण

December 22, 2010 5:54 PM0 commentsViews: 3

22 डिसेंबर

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ज्येष्ठ नेते भाऊसाहेब हिरे यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण प्रतिभाताईंच्या हस्ते मुंबईत झाले. या कार्यक्रमात आपल्याला पहिल्यांदा विधानसभेचे तिकिट कसे मिळाले हा किस्सा त्यांनी सांगितला.तसेच आजकाल तिकिट मिळवण्यासाठी थेट दिल्लीलाच जावं लागतं अशी कोपरखळी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी मारली. त्यावेळेला त्यांनी हा चिमटा काढल्याने सभागृहात एकच हशा उसळला. त्यावेळी कार्यक्रमाला हजर असलेले केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील जुन्या आठवणींमध्ये रमले. शरद पवार यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीतले भाऊसाहेब हिरेंचे योगदान समजावून सांगताना सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राच्या कार्यक्रमात त्यांची दखल न घेण्याची चूकही झाली अशी खंतसुद्धा व्यक्त केली आणि ती दुरूस्त करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

close