शेतकर्‍यांना नुकसान भरपाई जाहीर ; केंद्राची मदत घेणार

December 23, 2010 9:55 AM0 commentsViews: 2

23 डिसेंबर

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. पण शेतकर्‍यांना आणखी नुकसान भरपाई मिळावी म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेणार आहे. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्याचा परिणाम तर बाजारपेठेवर जाणवतोच आहे. पण शेतकर्‍यांच्या पदरात काहीही पडत नाही. त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. राज्य सरकारने दिलेली मदतही पुरेशी नाही. त्यामुळेच केंद्राकडून अधिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार आहे.नुकसानभरपाई

- द्राक्षपिकासाठी हेक्टरी 20 हजार रुपये मिळणार आहेत- संत्रासाठी हेक्टरी 15 हजार रूपये-भात पिकासाठी हेक्टरी 7500 रूपये – कांदा पिकासाठी हेक्टरी 7 हजार रूपये – इतर पिकांसाठी हेक्टरी 5 हजार रूपये- इतर फळ पिकांसाठी हेक्टरी 10 हजार रूपये नुकसानभरपाई मिळणार आहे.

close