कांदा साठेबाजाविरोधात धाडसत्र सुरू करणार- विखे-पाटील

December 23, 2010 10:06 AM0 commentsViews: 20

23 डिसेंबर

कांद्याच्या वाढलेल्या दराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. कांदा साठेबाजाविरोधात कारवाई करण्याची घोषणा कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. साठेबाजाविरोधात धाडसत्र राबवणार असल्याचे त्यांनी पुण्यात सांगितले.

कांदा आयातीवरची कस्टमड्युटी रद् करणे तसेच कांदा निर्यात बंदी केल्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे दर थोडेफार खाली आलेत. पण किरकोळ बाजारात मात्र फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे कांदा अजूनही तसा महागच आहे. मात्र काही ठिकाणी कांदा उतरला असून भावही हळूहळू खाली येत आहेत. अर्थातच यात शेतकर्‍यांबरोबर व्यापार्‍यांनाही थोडफार नुकसान सोसाव लागण्याची शक्यता व्यापारी वर्ग व्यक्त करत आहेत. मात्र भाव काही ठिकाणीच उतरले आहेत. आता सरकारने यावर योग्य नियंत्रण आणावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे.

कांद्याचा फटका शेतकर्‍यांनाच

खरिपाचा कांदा हातातून गेलाच आहे. निर्यातबंदी झाल्यामुळे कांद्याचे भाव उतरत असले तरी एकूणच अवकाळी पावसाचा फटका संक्रांतीपर्यंत येणार्‍या कांद्यालाही बसणार आहे. त्यामुळेच जो कांदी आकाराला 60 ते 70 मिमीचा असायचा तो यंदा कुठेतरी 30 ते 35 मिमीपर्यंत कसा बसा येऊ शकतो त्यामुळेच त्याचा थेट फटका पुन्हा शेतकर्‍यांना बसणार आहे. निर्यातबंदीमुळे व्यापार्‍यांचंच नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असले तरी येणार्‍या कांद्यांचे उत्पादनही फारसे होणार नाही. त्यामुळे त्याचाही फटका पुन्हा कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसणारच आहे. त्यामुळेच आता भरीव मदत हवी असं मत कृषीतज्ञांनी आमचा आजचा सवाल कार्यक्रमात व्यक्त केल.कांद्याचे भाव घसरले

लासलगावमध्ये चार दिवसांच्या तेजीनंतर कांद्याचे भाव घसरले आहेत. लासलगावमध्ये सरासरी 1800 रुपये क्विंटल तर कमाल 4100 रु क्विंटल दर आहे. तर मुंबईत 1.नं. कांदा 3 हजार रुपये प्रती क्विंटल तर 2 नं. कांदा-2 हजार प्रती क्ंविटल आहे. चिंगळी किंवा गारोटी कांदा हजार प्रती क्विंटल आहे. कांद्याची किरकोळ विक्री 30 ते 10 रुपये किलो दरम्यान सुरु आहे.

मुंबईमध्ये आज कांद्याचे भाव

1.नं. कांदा 3000 प्रती क्विंटल2नं. कांदा-2000 प्रती क्विंटलचिंगळी/गारोटी कांदा-1000 प्रती क्विंटलरिटेल भाव

1नं. कांदा 30 रु किलो2 नं. कांदा-20 रु किलो चिंगळी कांदा-10 रु किलो

नाशिकमध्ये कांद्याचे भाव घसरले

नाशिक कांदा भाव-लासलगाव – 4001 रू.प्रति क्विंटल मनमाड – 3400 रू. प्रति क्विंटल नांदगाव – 5000 रू.प्रति क्विंटल

close