कोल्हापूरात साचलं घाणीच साम्राज्य

December 23, 2010 10:38 AM0 commentsViews: 1

23 डिसेंबर

जागोजागी साचलेले कचर्‍याचे ढीग आणि प्रचंड दुर्गंधी हे चित्र आहे ऐतिहासिक कोल्हापूर नगरीचे कोल्हापूर शहरात कचरा उचलण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने कचरा उचलण्याचा ठेका रॅमकी कंपनीला दिला आहेत. पण या कंपनीमार्फत दररोज आणि सगळा कचरा उचललाच जात नाही. त्यामुळे शहरात ठिक ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचलेले दिसत आहेत. नागरिकांनी अनेकवेळा महानगरपालीकेकडे याबाबत तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरीकांतून संताप व्यक्त होत आहेत. महानगरपालिकेचा आरोग्य विभागाने या कंपनीच्या विरोधात कठोर पावले उचलावीत अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे.

-शहरात दररोज कचार्‍याचा उठाव नाही.-उपनगरातील कचरा उठाव करण्यासाठी रॅमकी कंपनीची टाळाटाळ- आरोग्य विभागाचं दुर्लक्ष-कोल्हापूर महानगरपालीकेकडे कचरा टाकण्यासाठी जागा नाही-नगरसेवकाचं या प्रश्नाकडं दुर्लक्ष-निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी पन्नास टक्के कचर्‍याचा उठाव होतो.

close