साहित्य संमेलनाला आयोजक स्वत:ची सुरक्षाव्यवस्था ठेवणार

December 23, 2010 10:59 AM0 commentsViews: 3

23 डिसेंबर

दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या नावाच्या वादामुळे ठाण्यात होणार्‍या 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमस्थळी आयोजक स्वत:ची सुरक्षाव्यवस्था ठेवणार आहे. साहित्य संमेलन सुरु होण्याअगोदरच संमेलन उधळुन लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडने काही दिवसांपूर्वी दिला होता.

संमेलन आयोजन समिती 60सुरक्षारक्षकही तैनात करणार आहेत. हे सुरक्षाजवान संमेलन परिसरात सुरक्षा देणार आहेत. याबरोबरच संमेलनाच्या ठिकाणी पोलिसांचा लवाजमाही सुरक्षेसाठी तैनात असणार आहे.

close