संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांची सीबीआय चौकशी

December 23, 2010 11:10 AM0 commentsViews: 4

23 डिसेंबर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. अजमेर आणि मक्का मस्जिद बॉम्बस्फोटाप्रकरणी त्यांचे नाव चर्चेत आहे. 2007 मध्ये अजमेरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या सीबीआयने तयार केलेल्या चार्जशीटमध्ये इंद्रेशकुमार यांचे नाव आहे. या बॉम्बस्फोटप्रकरणी 31 ऑक्टोबर 2005 मध्ये जयपूरमधल्या गेस्ट हाऊस मध्ये झालेल्या एका गुप्त बैठकीत इंद्रेशकुमार यांचा सहभाग असल्याचा सीबीआयचा दावा आहे. या बैठकीत देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, संदिप डांगे, रामजी कलासांगरे आणि चंद्रशेखर लवे हे उपस्थित होते. एटीएसने या सर्वांवर आरोपपत्र दाखल केले. दरम्यान आपल्याला विनाकारण अडकवण्यात येत असल्याचा आरोप इंद्रेश कुमार यांनी केला.

close