समाधान घोडके ‘महाराष्ट्र केसरी’

December 23, 2010 11:33 AM0 commentsViews: 84

23 डिसेंबर

रायगडमधल्या रोहा इथं सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. आज या स्पर्धेची अंतिम सामन्यात कोल्हापूरचा नंदकुमार आबदार आणि सोलापूरचा समाधान घोडके या कुस्तीगिरांमध्ये फायनल लढत झाली या लढती मध्ये समाधान घोडके विजयी ठरला आहे.

रोह्यात रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत सोलापूरचा समाधान घोडके महाराष्ट्र केसरी ठरला. समाधानने कोल्हापूरच्या नंदकुमार आबदारचा 4-0 ने पराभव केला. फायनलसाठी हजारो कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. सगळ्यांनाचं मॅच अटीतटीची होईल अशी आशा होती. पण समाधान घोडकेने एकतर्फी विजय मिळवत महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला . महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा त्याला प्रदान करण्यात आली. 30 वर्षांनंतर ही कुस्ती स्पर्धा रोह्यात रंगली आहे.

close