औरंगाबादमध्ये 7 जानेवारीला शोध मराठी मनाचा संमेलन आयोजित

December 23, 2010 11:50 AM0 commentsViews: 3

23 डिसेंबर

जागतिक मराठी अकादमीच्यावतीने औरंगाबाद येथे सात ते नऊ जानेवारी दरम्यान शोध मराठी मनाचा हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाच्या कार्यालयाचे उदघाटन आमदार विनायक मेटे यांनी केलं. प्रसिद्ध संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षेतखाली होणारे हे संमेलन देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत. या संमेलनात साहित्यिक, कलावंत, पत्रकार, राजकारणी, उद्योजक आणि वेगळ्या वाटा निवडणार्‍या मराठी माणसांचा सहभाग असणार आहे.

close