केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचं निधन

December 23, 2010 1:23 PM0 commentsViews: 3

23 डिसेंबर

केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचं आज (गुरुवारी) निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. दीर्घ आजारानं त्यांचं आज केरळमधल्या तिरुवनंतपुररमध्ये निधन झालं. श्वसनाला त्रास होत असल्याने त्यांना 10 डिसेंबरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते वेंटीलेटरवर होते. करुणाकरन हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी चार वेळा केरळचे मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. नरसिंह राव यांच्या सरकारमध्येही ते केंद्रीय उद्योगमंत्री होते.

close