नाशिक – संगमनेर मार्गावर रास्ता रोको आंदोलन

December 23, 2010 3:06 PM0 commentsViews: 3

23 डिसेंबर

वाढलेले कांद्याचे भाव अचानक खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहे. संगमनेर कृषी बाजार समितीत आज कांद्याचे भाव प्रती क्विंटल 1500 रुपयांनी उतरले. त्यातचं लिलावादरम्यान एका व्यापार्‍याने शेतकर्‍याला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला. शेतकर्‍यांनी नंतर नाशिक-संगमनेर मार्गावर आपला मोर्चा वळवला. जवऴपास दोन तास शेतकर्‍यांनी या मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास 800 शेतकरी यात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे 2 तास या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरु केली. कांद्याला योग्य किमंत मिळून देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली.

close