आयएसआय एजंट जावेद मोजावाला काँग्रेसच्या युथ ब्रिगेडचा सदस्य

December 23, 2010 3:13 PM0 commentsViews: 3

23 डिसेंबर

मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आयएसआय एजंट जावेद मोजावाला विषयी पोलिसांनी नवा खुलासा केला. जावेद मोजावाला हा काँग्रेसच्या मुंबईतील युथ ब्रिगेड विंगचा एक सदस्य होता. आणि ज्यावेळी राहुल गांधी मुंबई दौर्‍यावर आले होते त्यावेळी जावेद मोजावाला याने काँग्रेसचा सदस्य म्हणून अनेक ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली होती. मुंबई पोलिसांनी जावेदला काल कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी पोलीस तपासात हा खुलासा झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या बातमीमुळे काँग्रेसपक्षात खळबळ माजली असून जावेद मोजावला हा काँग्रेसचा मुंबईतील युथ ब्रिगेडचा सदस्य नसल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

close