मुंबईत 4 अतिरेकी घुसले

December 23, 2010 4:05 PM0 commentsViews: 1

23 डिसेंबर

नववर्षाच्या तोंडावर लष्कर-ए-तोयबाचे 4 अतिरेकी मुंबईत दाखल झाले अशी माहिती सह पोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी आज जाहीर केली आहे. उत्सवाच्या वेळी मोठा घातपात घडवण्याचा अतिरेक्यांचा इरादा असण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांनी 4 जणाचे स्केच जारी केले आहे. हे चारही अतिरेकी 20 ते 30 या वयोगटातील आहेत. वालिद जिन्हा, अब्दुल करीम मुसा, मेहफूज आलम आणि नूर अली अशी या चौघा संशयित अतिरेकींची नावं आहे. या चार अतिरेक्यांपैकी वालिद जिन्हा नावाच्या अतिरेक्याचा स्केच जारी करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहवावे. कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास 22633333 किंवा 100 नंबरवर कळवावे. असे आवाहन रॉय यांनी केले आहे.

close