नाशिकमध्ये पैसे दुप्पट करुन देणार्‍या इव्हेंट कंपन्याच्या सुळसुळाट

December 23, 2010 7:44 AM0 commentsViews: 4

23 डिसेंबर

18 दिवसात दीडपट तर दोन महिन्यात दुप्पट पैसे मिळवा या आमिषाने ग्राहकांना फसवणार्‍या हेवन इव्हेंट या कंपनी विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला. फसलेल्या ग्राहकांनी कंपनीचा मॅनेजर अशरफ खान याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. हेवन इव्हेंट या कंपनीनं 15 कोटी रुपयांना नाशिकमधल्या गुंतवणूकदारांना गंडा घातला. आतापर्यंत 335 गुंतवणूकदारांनी याविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. गुंतवणूकदारांना फसवणार्‍या अशा अनेक कंपन्यांचे नाशिकमध्ये पेव फुटलं आहे. गुंतवणुकदारांनी याबाबत सतर्क राहाण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

close