रेशन दुकानांवर स्वस्त भावात कांदा मिळणार

December 23, 2010 4:53 PM0 commentsViews: 1

23 डिसेंबर

कांद्याच्या झालेल्या दरवाढीमुळे सर्व सामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे. यावर उपाय म्हणून सरकारने निर्यातीवर बंदी घातली आहे. तरी सुध्दा कांद्याच्या भावात काही फरक पडला नाही राज्यभरात कांद्याचे भाव काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त आहे. पण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत उद्यापासून (शुक्रवारपासून) सहकारी भांडारांमधून कांदा मिळणार तर पुढच्या आठवड्यापासून राज्यभरात रेशन दुकानांवर स्वस्त भावात कांदा मिळणार आहे. अशी घोषणा नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने केली आहे.

close