प्रणव मुखर्जी चा प्रस्ताव विरोधकांनी फेटाळला

December 23, 2010 6:00 PM0 commentsViews: 21

23 डिसेंबरसंयुक्त संसदीय समितीच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधक यांच्यातला तणाव चांगलाच वाढला आहे. जेपीसीवर विरोधकांची चर्चेची तयारी असेल तर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावू, असा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिला होता. पण विरोधकांनी तो फेटाळला.तर संसदेचा वेळ वाया घालवल्याबद्दल विरोधकांनी माफी मागावी अशी मागणी मुखर्जी यांनी केली.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून संसदेत झालेल्या संघर्षानंतर यूपीए सरकार आणि विरोधक यांच्यात आता मानसिक युद्ध सुरू झालं. आणि यात आघाडी घेतली ती काँग्रेसनं. बुधवारी सीएनएन-आयबीएनच्या इंडियन ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना प्रणव मुखर्जी यांनी विरोधकांना अनपेक्षित धक्का दिला. जेपीसीवर विरोधक चर्चा करायला तयार असतील तर सरकार संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

close