साध्वी प्रज्ञाला कायदेशीर मदत देणार -खा. संजय राऊत

November 1, 2008 2:19 PM0 commentsViews: 4

01 नोव्हेंबर,दिल्ली – साध्वी प्रज्ञाला कायदेशीर मदत देणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. अफजल गुरु आणि दाऊदला कायदेशीर मदत मिळू शकते. तर साध्वीला का नाही असा सवालही त्यांनी केला. नवी दिल्ली इथे बोलत असताना ते म्हणाले जे लोक पकडले आहेत ते दहशतवादी नाहीत. त्यांना संशयावरून ताब्यात घेतलंय. त्याच्यावरील आरोप अजून सिद्ध व्हायचे आहेत. असं असलं तरी सरकार, मीडिया त्यांना दहशतवादी ठरवून त्यांना बदनाम करत आहेत.याप्रकरणी एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेला त्यांना मदत करणं गरजेचं आहे असं ते पुढे म्हणाले.

close