नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना केंद्राकडून पॅकेज जाहीर

December 24, 2010 10:50 AM0 commentsViews: 2

24 डिसेंबर

अवकाळी पावसाची झळ पोहचलेल्या राज्यातल्या शेतकर्‍यांना केंद्र सरकारकडून 400 कोटी पेक्षा जास्त रुपयांची तातडीची मदत राज्याला मिळणार आहे. यामध्ये पंतप्रधान कार्यालयाकडून 200 कोटी रुपये, कृषी विभागाकडून 200 कोटी रुपये, आणि इतर विभागांकडून साधारण 100 ते 150 कोटी रुपये असे मिळून 400 कोटींहून अधिक रुपयांची मदत मिळणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएन-लोकमतला दिली. मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मनमोहन सिंग यांची आज भेट घेतली. याबरोबरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचीसुद्धा स्वतंत्रपणे भेट घेतली.

close