मनपाच्या कारभारामुळे प्राणिसंग्रहालयातील प्राणी 3 दिवस उपाशी

December 24, 2010 11:32 AM0 commentsViews: 16

24 डिसेंबर

औरंगाबाद मनपाच्या अंदाधुंद कारभारामुळे सिध्दार्थ उद्यानातील मुक्या प्राणी 3 दिवस उपाशीच राहिले. प्राणीसंग्रहालयात खाद्यपुरवठा करणार्‍या कंत्राटदाराचे तीन महिन्यांचे बिल महानगरपालिकेने थकवलं आहेत. त्यामुळे त्याने आधी बिल काढा मगच खाद्य पुरवठा करतो अशी भूमिका घेतली. त्याचा परिणाम उद्यानाच्या खाद्यपुरवठ्यावर झाला नाही. परिणामी मुक्या प्राण्यांना उपासमार सहन करावी लागली. त्यातील काही प्राणी आजारीही पडलेत. भानू नावाची पांढरी वाघीण सध्या आजारी आहे. इतर प्राण्यांनाही त्याचा फटका बसला. अखेर उद्यान अधिक्षकांनी महानगरपालिकेला या प्रकरणाची माहिती कळविताच तातडीने बिल काढण्यात आली. पण त्यामुळे महानगरपालिकेतील हा सावळागोंधळ समोर आला आहे. एवढे होऊनही प्राणी उपाशी राहिल्याचे महापौर मात्र मान्य करत नाही.

close