रस्ता रुंदीकरणासाठी 10 किलोमीटर पर्यंत ‘लोटांगण’ आंदोलन

December 24, 2010 12:21 PM0 commentsViews: 2

24 डिसेंबर

बुलढाणा जिल्ह्यातल्या आसलागाव इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रुंदीकरणासाठी अनोख आंदोलन केले. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी हातापायात साखळी बेड्या टाकून लोटांगण आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी चक्क 10 किलोमीटरपर्यंत लोटांगण घातले. पळशी सुपा या धार्मिक स्थळी दरवर्षी यात्रा भरते. पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो भविकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्याच्या मागणीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

close