साहित्य संमेलनाची माहिती नसल्याची नागरिकांची तक्रार

December 24, 2010 12:29 PM0 commentsViews: 2

24 डिसेंबर

ज्या संमेलनावरून वाद सुरू आहेत त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ठाण्यातल्या जनतेला माहितीच नाही. साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीने संमेलनाची जाहिरातच योग्य प्रकारे केलेली नाही. फक्त पोस्टरबाजी व्यतिरिक्त संमेलनाविषयी अन्य कोणतीही माहिती आयोजन समितीने लोकांपर्यंत पोहोचलेली नाही.

आयोजकांची कानउघाडणी

84 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तोंडावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आयोजकांमध्ये संवादाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. भर पत्रकार परिषदेतच तिथल्या लोकप्रतिनिधींनी आयोजकांची कानउघाडणी केली. आणि आपले आक्षेप उघडपणे मांडले.

84 व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक मुद्दे समोर येत आहेत कधी ते वादाचे असतात, तर कधी समन्वयाच्या अभावाचे. लोकप्रतिनिधी आणि आयोजक यांच्यातल्या विसंवादाचा मुद्दा उपस्थित करुन या संमेलनाच्या अर्थनियोजन समितीचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे उपसभापती असलेले वसंत डावखरे यांनी संमेलनाच्या आयोजकांची कानउघाडणी केली.

कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम किंवा संमेलन म्हटले की रुसवे फुगवे आलेच पण सारस्वतांच्या दरबारात सामंजस्याची अपेक्षा करणार्‍यांच्या पदरी निराशा पडणार नाही याची काळजी मात्र घेण्याची गरज आहे.

close