ए राजा सीबीआय चौकशीला हजर

December 24, 2010 12:56 PM0 commentsViews: 2

24 डिसेंबर

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता पर्यंतचा सर्वात मोठया महाघोटाळा टू जी स्पेक्ट्रम घोटाळाच्या आरोप ए राजा यांच्यावर आहे. सीबीआयने काही दिवसांपूर्वी नीरा राडिया यांची चौकशी केली होती.

आज शुक्रवारी ए राजा यांची सीबीआय अधिकार्‍यांनी चौकशीला सुरुवात केली आहे. 24 डिसेंबरला सकाळी 10 वाजता चौकशीसाठी हजर होईन असं राजा यांनी सांगितलं होते. त्यानुसार ते आज हजर झाले. टू जी स्पेक्ट्रम प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीसमोर हजर राहण्याचे आदेश सीबीआय अधिकार्‍यांनी राजा यांना दिले होते.

close